Wednesday, April 1, 2009

भैरवी

भैरवी
माझ्याच तो सुरात
हरवून गात गेला
अन कालांतराने
नियतीने घात केला
मी उध्वस्त--
सडा अश्रूंचा सांडला
पण जाणीव मम
दुःखाची न जाहली तयाला
माझ्याच स्वप्नावेली
हृदयात त्या जळाल्या
निशिदिन याद तुझी
त्या माझ्याच आसवाला.
भंगूनी मी उरले कशी
उरले अशी ...सावरू कशी?
सावरुनी मी समजाविले मनाला
अन अखेरीस मी भैरवी आळविला.